मराठी विरामचिन्हांची संपूर्ण माहिती – Viram Chinh In Marathi

मराठी भाषेचा उद्गम संस्कृत पासून झाला आहे. अगदी सुरुवातीला मराठी भाषा मोडी लिपीत लिहिली जात होती, त्या लिपित विराम चिन्हांचा समावेश नव्हता. कालांतराने मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कँडी ह्यांनी. सर्वप्रथम मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली.

आणि तेव्हा पासुनच मराठी भाषेत पहिल्यांदा विरामचिन्हे वापरण्यास सुरुवात झाली. हा तर झाला छोटासा इतिहास आता आपण पाहुया, विराम चिन्ह म्हणजे नेमक काय असत? कोणतेही वाक्य अथवा परिच्छेद वाचन करताना,

कोठे व किती वेळ थांबायचे आणि कोणत्या शब्दांवर किती जोर द्यायचा अथवा नाहीं, हया सर्वांचा अचूक बोध होण्यासाठी विरामचिन्हांचा वापर केला जातो. विराम+चिन्ह = विराम म्हणजे थांबने, विश्रांति घेणे आणि हा विराम किती क्षण घ्यायचा.

व ते वाक्य लिहिणाऱ्या व्यक्तीच्या मनातील भावना प्रकट करणार्‍या खूना म्हणजे चिन्ह. आता आपण viram chinh in marathi ह्या मायबोली लेखात मराठी भाषेत वापरली जाणारी सर्व विराम चिन्ह पाहुया.

अनुक्रमणिका hide

मराठी विरामचिन्हे व त्यांचे स्पष्टीकरण viram chinh in marathi

१. पूर्णविराम [ . ]

वाचताना किवां बोलताना एखादे वाक्य पूर्ण झाले, ह्या अर्थाने अपना जेथे क्षणभर थांबतो तेथे पूर्णविराम [.] चा उपयोग होतो. कोणतेही वाक्य अथवा परिच्छेद पूर्ण झाले आहे, हे दर्शवणाऱ्या विराम चिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

  1. माझी आई चविष्ट जेवण बनवते.
  2. आज आपला क्रिकेट चा सामना आहे.
  3. मी उद्योगपति होणार.

महत्त्वाचे – पूर्णविराम हा एखाद्या नावाचे संक्षिप्त रूप दर्शवण्यासाठी सुद्धा वापरतात.

उदाहरणार्थ :-

स. न. वि. वि. = सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

वि. दा. सावरकर = विनायक दामोदर सावरकर.

पूर्णविराम ला इंग्रजी भाषेत फुल स्टॉप [full stop] असे म्हणतात.

२. स्वल्पविराम [ , ]

ज्या वाक्यात अथवा शब्दात अल्प विश्रांति घेतली जाते पण वाक्य पूर्ण झालेले नसते, अशा वाक्यात स्वल्पविराम हया विराम चिन्हाचा उपयोग होतो. नाम, सर्वनाम, क्रियापदे इ. समान जातीचे शब्द एका मागे एक आल्यास,

त्या शब्दांच्या मध्ये स्वल्पविराम चा वापर करण्यात येतो, तसेच एकाच प्रकारचे एका पेक्षा अधिक वाक्य क्रमाने आल्यास किंवा एखाद्या नावाचे संबोधन प्रकट करण्यासाठी स्वल्पविराम चा उपयोग केला जातो.

उदाहरणार्थ :-

  1. काल बाजारात मेथी, बटाटे, वांगी व गवार हया भाजांचे भाव अधिक होते.
  2. मला मराठी, भूगोल, सामन्य विज्ञान व हिंदी हे विषय सोपे वाटतात.
  3. संदीप, तुला उद्या शाळेत लवकर बोलवल आहे.

स्वल्पविरामला इंग्रजीत कॉमा असे म्हणतात.

viram chinh in marathi

३. अपूर्णविराम [:]

एखादे वाक्य पूर्ण झाले असता शेवटी काही तपशील द्यावयाचा असतो, त्या वाक्याच्या शेवटी अपूर्णविराम हे विराम चिन्ह वापरतात.

उदाहरणार्थ :-

भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली शहरे : मुंबई, दिल्ली, बंगलोर, कोलकाता, चेन्नई व अहमदाबाद.

परीक्षेत पुढील पट क्रमांकाचे विधार्थी उतीर्ण आहेत : २,३,४,८,९,१०,२२,३३,५५.

महत्वाचे : अपूर्णविराम हा कधीही अक्षराला जोडून लिहित नाहीत.

अपूर्णविराम ला इंग्रजीत कोलन [कोलन] असे म्हणतात.

 

४. अर्धविराम [ ; ]

लिखाण करताना वाक्यात ज्या ठिकाणी अधिक विश्रांति घेतली जाते, पण ते वाक्य पूर्ण झालेले नसते. त्या ठिकाणी अर्धविराम हया विराम चिन्हाचा उपयोग केला जातो.

दोन छोटी-छोटी वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययाचा वापर करुण, अथवा न करता जोडण्याकरिता अर्धविरामचा वापर होतो.

उदाहरणार्थ :-

  1. रवीने परिशेसाठी खुप मेहनत केली होती; पण त्याला हवे तसे परिणाम मिळाले नाही.
  2. त्याची स्मरण शक्ति उत्तम आहे; पण अभ्यास करीत नहीं.

अर्धविराम चिन्हाला इंग्रजीत  सेमी कोलन असे म्हणतात.

५. उद्गारवाचक चिन्ह [ ! ]

वाक्यामध्ये असलेली एखाद्या मनुष्या च्या मनातील कोणतीही भावना व त्या भावनेची तीव्रता स्पष्ट दर्शवण्याकरिता उद्गारवाचक चिन्ह [ ! ] वापरण्यात येते. हे विराम चिन्ह त्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी देतात.

केवल प्रयोगी शब्द सुद्धा मनुष्य मनातील विकार दर्शवण्यासाठी वापरत घेतले जातात, म्हणून केवलप्रयोगी शब्दांच्या पुढे सुद्धा उद्गारवाचक चिन्ह [ ! ] वापरतात.

उदाहरणार्थ :-

  1. अरे वा! आज घरी मेजवानी आहे.
  2. अभिनंदन! संदीप तू खेळ जिंकलास.
  3. बापरे! किती भयानक प्राणी आहे तो.
  4. आहाहा! किती सुंदर फुल बाग आहे.

महत्वाचे:

एखाद्या वाक्याच्या उद्गारा मधील तीव्रता स्पष्ट दर्शवण्याकरिता एका एकापाठोपाठ तीन [!!!] उद्गारवाचक चिन्ह देतात

उद्गारवाचक विराम चिन्हाला इंग्रजीत एक्सकलामशन मार्क (exclamation mark ) असे म्हणतात.

६. प्रश्नचिह्न ( ? )

लिखाणात जेव्हा एखादा प्रश्न विचारलेला असतो, तेव्हा त्या प्रश्नाच्या शेवटी [?] प्रश्नचिन्ह वापरतात. हया विराम चिन्हाचा उपयोग प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी केला जातो.

उदाहरणार्थ :-

  1. संदीप तुझ्याकडे पेन आहे का?
  2. आई आज रात्रीच्या जेवणात भाजी काय आहे?

प्रश्नचिह्न ला इंग्रजीत question mark असे म्हणतात.

७. अवतरणचिन्ह

एखादा विशेष महत्वाचा शब्द किंवा वाक्य जसे च्या तसे नमूद करण्या साठी [बदल न करता ] असे ‘….’ किंवा असे “…..” विराम चिन्ह वापरतात. ह्याना अनुक्रमे ‘एकेरी अवतरणचिन्ह’ अणि “दुहेरी अवतरण चिन्ह” असे म्हणतात.

अ. एकेरी अवतरणचिन्ह (‘…’)

जेव्हा वाक्यात लिहिताना एखादा विशेष शब्द येतो. व तो काहीही फेरबदल न करता जसाच्या तसा नमूद करावयाचा असतो तेव्हा त्या शब्दाला एकेरी अवतरण चिन्हात लिहिले जाते.

उदाहरणार्थ :-

  1. ‘मुंबई’ हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे.
  2. भारताचे राष्ट्रगीत, ‘जन गण मन’ हे कवी आणि नाटककार रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखनातून स्वीकारलेले आहे.

ब. दुहेरी अवतरण चिन्ह (“…”)

एखाद्या व्यक्ति च्या मुखातून उच्चारलेले वाक्य बदल न करता जसे च्या तसे लिहून दाखवायचे असल्यास, दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग होतो. ह्या विराम चिन्हाच्या उपयोगामुळे वाक्य अधोरेखित पण केले जाते.

उदाहरणार्थ :-

  1. “मी दिल्ली मध्ये आहे” असे तो म्हणाला.
  2. शिरीष म्हणाला “उद्या मी नक्की येतो” पण तो अजुन काही आला नहीं.

अवतार चिन्हाला इंग्रजीत इनवर्टेड कॉमा (inverted commas) असे म्हणतात.

८. संयोग चिन्ह

मराठी व्याकरण मध्ये दोन शब्दांच्या मधील परस्पर संबध दर्शवन्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केला जातो. सामासिक शब्दा मधील दोन पदामध्ये [-] <– हे विराम चिह्न असते, त्याला संयोग चिन्ह म्हणतात.

दोन शब्द जोडन्यासाठी संयोग चिन्ह वापर

उदाहरणार्थ :-

राम-कृष्ण, गंगा-यमुना, नवरा-बायको.

लिहिताना ओळीत वाक्याच्या शेवटी एखादा शब्द अपूर्ण राहिला असता तेथे संयोग चिन्ह वापरण्यात येते.

उदाहरणार्थ :-

१९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरा नजीक वसलेल्या शिव- <————- 
नेरी या डोंगरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

९. अपसरण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह (—)

लिहिताना जेव्हा अपनास एखाद्या बाबीचा खुलासा करावयाचा असतो. तेव्हा [—] अपसरण चिन्ह वापरण्यात येते.
हे विरामचिन्ह लिहिताना लांबीला संयोग चिन्हाच्या दुप्पट असते. हे पहा [—] <————-

उदाहरणार्थ :-

रवि काका चे लहान भाऊ तीन — शशिकांत, शिवनाथ, रघुपति.

इंग्रजीत अपसरण चिन्हाला ‘एम-डॅश’ असे म्हणतात.

१०. लोप चिन्ह

लिहिताना जेव्हा एखादा विचार मध्येच खंडित, अपूर्ण असतो किंवा क्षणभर शांती दर्शवायची असते. त्या ठिकाणी लोप चिन्हाचा उपयोग केला जातो.

हे आहे लोप चिन्ह (…) <———-

उदाहरणार्थ :-

  1. काल मला ‘झापटलेला’ चित्रपट पहायचा होता पण………
  2. बाबा…भाऊला …….हजार रूपये

११. दंड:

मराठी भाषेतील अभंग श्लोक किंवा ओवी लिहिताना, त्या अभंगा मध्ये एकेरी दंड [|]व दुहेरी दंड[||] वापरला जातो.

उदाहरणार्थ :-

ऐसी परंपरा आलीसे चालत | भलत्याची नीत त्यागावरी || <——

हो का पिता पुत्र बंधु कोणी तरि | विजाति संग्रही धरू नये || <—–

१२. आणखी काही विराम चिन्हाचे प्रकार पहा.

अ. विग्रह चिन्ह

दिंनाक स्पष्ट लिहितानी हया चिन्हाचा [-] वापर होतो.

उदाहरणार्थ :-

तारीख-महिना-वर्ष

५-१२-१८४७.

ब. डॉट चिन्ह (०)

एखाद्या विशेष शब्दाच्या संक्षिप्त रुपाचा अर्थबोध प्रकट करण्या साठी त्या शब्द समोर (०) <=== हे चिन्ह वापरतात.

उदाहरणार्थ :-

  1. डॉक्टरसाठी – डॉ०
  2. प्राध्यापक – प्रा०
  3. इंजिनिअर- इ०

क. अधिकचा काना

काही वर्षा पूर्वी आपल्या मायबोली मराठी ‘साहेब’ चे संक्षिप्त रूप लिहिताना जास्तीचा काना वापरला जात.

उदाहरणार्थ :

  1. ‘रावसाहेब’साठी – रावसोा
  2. आप्पासाहेब – आप्पासोा
  3. तात्यासाहेब – तात्यासोा

महत्वाचे – अजूनही कोल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत साहेब हा मान देण्यासाठी जास्तीचा काना वापरला जात आहे.

मराठी व्याकरण मध्ये “किवां” शब्द एवजी [/] (तिरपा डॅश)(स्लैश ) वापरतात.

विराम चिन्हांच्या व्यतिरिक्त छ्पलेल्या मजकुरात काही छपाई चिन्हे.

पुढीलप्रमाणे काही छपाई चिन्हे आढळतात

एकेरी खंजीर [†] – छापील मजकुरात एखाद्या शब्दाचे किंवा वाक्याचे स्पष्टीकरण, जेव्हा त्या मजकुर छापील पानाच्या तळाशी दिले जाते. तेव्हा त्या ठिकाणी शब्दाला लागून हे चिन्ह [†] वापरतात व एकापेक्षा अधिक खुलासे स्पष्ट केले असतील तर दुहेरी खंजीर (‡), व तारा (*) याचाही उपयोग केला जातो .

परिच्छेद चिन्ह (¶)

हया चिन्हाचा उपयोग त्याच्या नावातच स्पष्ट दिलेला आहे, म्हणजे परिच्छेद दाखवण्यासाठी परिच्छेद चिन्ह (¶) वापरले जाते.

परिछेद चिन्हाला इंग्रजी भाषेत “पिलक्रो” असे म्हणतात.

काकपद (^)

खुप वेळेस लिहिताना एखाद्या वाक्यतला शब्द आठवत नहीं, तेव्हा त्या शब्दाच्या ठिकाणी काकपद [^] हे चिह्न वापरले जाते.

उदाहरणार्थ :-

राजीव म्हणाला होता मी ^ आहे.

“वनस्पतिशास्त्रज्ञ” <—– विसरलेला शब्द

विराम चिन्हा बाबत काही महत्वाची माहिती:

  • मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थॉमस कँडी या व्यक्ती ने सर्वप्रथम मराठी भाषा देवनागरीत लिहन्यास सुरुवात केली.
  • मेजर थॉमस कँडी हे “ब्रिटिश ईस्ट इंडिया” कंपनीच्या सैन्यातील अधिकारी, शिक्षक आणि कोषकार होते.
  • फक्त अपूर्णविरामा हे विराम चिन्ह सोडून, इतर विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून लिहितात.
  • अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडली जात नाही. म्हणुनच विरामचिन्हानंतर एक जागा [स्पेस] सोडून पुढचा शब्द [असेल तर] लिहिला जातो.
  • उद्गारवाचक हे चिन्ह शब्दा मध्ये दडलेली भावना स्पष्ट करण्यासाठी वापरतात.
  • विराम चिन्हाच्या वापरा पूर्वी मराठी भाषा मोडी लिपी मध्ये लिहिली जात होती.

एखाद्या वाक्यत अथवा परिच्छेदत विरामचिन्हे नसतील तर, ते वाक्य कोठे संपले आहे अणि कोठे सुरु होते व त्याचे शुद्ध उच्चारण कसे करायचे, हे वाचनार्‍याला समजत नाही. भाषेला शुद्ध व सुदंर ठेवान्यासाठी विरामचिन्हे उपयोगी ठरतात. म्हणूनच लिखाणात विराम चिन्हांचा वापर करने गरजेचे आहे.

लेखाचा सारांश :

मित्रानो, आज ह्या लेखात आपण मराठी व्याकरणात वापरली जाणारी विराम चिन्हे अभ्यासली, ही विराम चिन्हे आपले लेखन शुद्ध करण्यासाठी आवश्यक आहेत. तसेच मराठी भाषेत लिहिली जाणारी पत्र व निबंध विराम चिन्हांच्या वापरने अधिक आकर्षक होतात, तसेच जर तुम्ही स्पर्धा परिक्षेची तय्यारी करीत असाल, तर ही सर्व विराम चिन्हे तुम्हाला नक्की माहित असायला हवी.

आमचा लेख viram chinh in marathi संपूर्ण वाचल्याबद्दल आभारी आहोत. हा लेख आपल्या इतर वर्ग मित्रान सोबत शेयर करायला विसरु नका व पुढील लेख वाचण्या आधी viram chinh in marathi ह्या लेखावर टिप्पणी(comment) जरुर करा.

Thank you for reading my article if you love this kindly comment on this and share it with your friends.

होमपेज

आणखी काही महत्वाचे लेख जरुर वाचा

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *