tuna fish in marathi

टुना माशाचे मराठी नाव, फायदे व अद्भुत तथ्य | Tuna fish in marathi

सध्या इंटरनेटवर खुप सारे लोक टूना माशा चे मराठीत नाव व माहिती शोधत आहेत. म्हणूनच आज आपन ह्या पोस्ट मध्ये व टूना फिश चे मराठी नाव, फायदे अणि टूना फिश चे आश्चर्यकारक तथ्य पाहणार आहोत. मित्रानो हा लेख तुमच्यासाठी माहितीपूर्ण व मनोरंजक असणार आहे, म्हणून tuna fish in marathi हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Answer :Tuna fish marathi name is “kupa” टुना माशाचे मराठी नाव “कुपा मासा” असे आहे.

टूना फिशचे आरोग्या साठी फायदे Tuna fish in marathi

हृदयाचे आरोग्य सुधारते
आहारात टूना फिश असल्याचा सर्वात मोठा सकारात्मक फायदा म्हणजे हृदयाचे आरोग्य सुधारते. टूना फिश मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. जे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास व रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. आहारात टूना फिश समाविष्ट केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यात मदत
टूना फिश मध्ये कर्बोदक आणि चरबी चे प्रमाण कमी असते, तरीही हयात प्रथिने जास्त प्रमाणात असतात अणि हीच प्रथिन शरीरातील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी खुप महत्वाची भूमिका बजावतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर
टूना फिश मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड सोबत आणखी काफी आवश्यक खनिजे सुद्धा असतात, जे डोळ्यांशी संबंधित अनेक विकार टाळन्या साठी व त्यांना बरे करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

किडनीच्या आजारात आराम दायक
टूना माशांमध्ये सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण संतुलित असते, सोडियम आणि पोटॅशियम एकत्रितपणे शरीरातील द्रव संतुलन व्यवस्थापित करतात, म्हणून मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करू शकतात.

tuna fish in marathi

हाडे निरोगी ठेवान्या साठी
हाडांना निरोगी ठेवण्यासाठी कैल्शियम व ड जीवनसत्त्वाची आवश्कता असते. कारण कॅल्शियम मुळे हाडे तैयार होण्यास व ड जीवनसत्त्वा मुळे हाडे बळकट होण्यास मदत होते. टूना फिश मध्ये ही दोन्हीं पोषक तत्व मोठया प्रमाणावर असतात.

शारीरिक विकासात मदत
प्रथिन ही मानवी शरीराची योग्य वाढ होण्यासाठी खुप आवश्यक असतात. प्रथिनांमुळे मानवी शरीराच्या बाह्य व अंतर्गत जखमा देखील लवकर बर्या होतात. टूना फिश मध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त असते. 100 ग्रॅम ट्यूना फिशच्या एका सर्व्हिंगमुळे 60% ते 70% प्रथिनांची आवश्यकता पूर्ण होते. म्हणून हल्ली लोकांच्या आहारातील टूना फिश चे प्रमाण वाढत आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
कोणत्या ही आजारा पासून दूर राहण्यासाठी व झालेला आजार लवकर बरा होण्यासाठी. आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती ची आवश्कता सतत भासते. टूना फिश मध्ये असले ओमेगा 3 फॅटी ऍसिड रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यास मदत करते.

marathi name of tuna fish is “kupa”. “टूना फिश ला मराठी मध्ये कुपा मासा असे म्हणतात”.

marathi name of tuna fish

100 ग्रॅम टूना फिश पौषक तत्वे – Tuna fish in marathi

USDA नॅशनल न्यूट्रिएंट डेटाबेसनुसार, 100 ग्रॅम निरोगी ट्यूना फिश मध्ये खालीलप्रमाणे पौषक तत्वे अढळतात
पाणी: 59.09 grams
ऊर्जा/कॅलरी: 770 kJ
प्रथिने: 29.92 grams
लिपिड (चरबी): 6.27 grams
लोह: 1.32 mg
मॅग्नेशियम: 64 mg
फॉस्फरस: 326 mg
पोटॅशियम: 323 mg
सोडियम: 50 mg
झिंक: 0.77 mg

मराठीत टूना फिश बद्दल आश्चर्यकारक तथ्य Amazing facts about tuna fish in marathi

1. टूना फिश ही उत्तम प्रकार ही जलतरणपटू असते. हा मासा 70 किमी/तास (43 mph) वेगाने पोहण्यास देखील सक्षम आहे.

2. पांढरे मांस असलेल्या समुद्रातील इतर माशांच्या विपरीत, ट्यूनाचे स्नायू ऊतक गुलाबी ते गडद लाल रंगाचे असतात. म्हणजे टूना फिश चे मांस गुलाबी ते गडद लाल रंगाचे असते.

3. टूना फिश मध्ये ब्लूफिन ट्यूना सारख्या काही प्रजाति उबदार रक्ताच्या असतात, त्यांचा विशेष गुण म्हणजे, ब्लूफिन टूना फिश स्नायू हलवून, आपल्या शरीराचे तापमान पाण्याच्या तापमानापेक्षा जास्त वाढवू शकतात. हा गुणधर्म त्यांना थंड पाण्यात टिकून राहण्यास आणि समुद्रातील वैविध्यपूर्ण वातावरणात सक्षम राहण्यास मदत करतो.(tuna fish in marathi)

4. टूना फिश सामान्य चयापचय द्वारे निर्माण होणारी उष्णता वाचवून शरीरातील तापमान संतुलित करते.

5. क्या तुम्हला माहित आहे? पूर्व प्रशांत महासागरात टूना फिश च्या बहुतेक प्रजाति शार्क माशा पासून आपला बचाव करण्यास साठी डॉल्फिन कळपा च्या आसपास राहतात.

6. टूना हे स्कॉम्ब्रिडे कुलातील खाऱ्या पाण्यात राहणारे मासे आहेत.

7. टूना हा मासा थुन्नुस वंशाचा आहे. थुन्नुस वंशाचे मासे हे आकारा ने मोठे असतात, त्यामुळे त्यांचे व्यापारी मूल्य ही सर्वात अधिक असते.

कुपा मासा वैज्ञानिक वर्गीकरण Tuna fish Scientific classification in marathi

  • वैज्ञानिक नाम: थुन्निनी (Thunnini)
  • कुल: स्कॉमब्रिडे
  • वंश: थुन्नुस
  • वजन : 1.8 kg ते 684 kg तक (वजन प्रजाति ला अनुसरून)
  • लांबी : 50 cm ते 4.6 m (लांबी प्रजाति ला अनुसरून)

Tuna fish species name in marathi | टुना माशांच्या प्रजातींची मराठीत नावे

  1. एल्बाकोर, थुन्नुस अलालुंगा
  2. येल्लोफिन टूना, थुन्नुस एल्बाकारेस
  3. ब्लैकफिन टूना, थुन्नुस एटलांटिकस
  4. दक्षिणी ब्लूफिन टूना, थुन्नुस माक्कोयी
  5. बिगआई टूना, थुन्नुस ओबेसस
  6. पैसिफिक ब्लूफिन टूना, थुन्नुस ओरिएंटलिस
  7. उत्तरी ब्लूफिन टूना, थुन्नुस थायन्नुस
  8. लॉन्गटेल टूना, थुन्नुस टोंग्गोल
  9. करासिक टूना, थुन्नुस करासिकस
  10. स्लेंडर टूना एल्लोथुन्नुस फल्लाई
  11. बुलेट टूना ऑक्सिस रोचेई
  12. टेर्रिओवीपेट टूना ऑक्सिस टोंगोलिस
  13. फ्रिगेट टूना ऑक्सिस थाज़र्ड
  14. कावाकावा (लिटिल टूना या मैकेरल टूना) यूथायन्नुस एफ्फिनिस
  15. लिटिल टुन्नी (लिटिल टूना) यूथायन्नुस एल्लेटरेटस
  16. ब्लैक स्किपजैक टूना यूथायन्नुस लिनेटस
  17. डॉगटूथ टूना जिम्नोसर्डा यूनीकलर
  18. स्किपजैक टूना कात्सूवोनस पेलामिस
  19. लाइनसाइड टूना, थुन्नुस लिनिअस

जगातील सर्वात मोठी टूना फिश | Tuna fish in marathi

जगातील सर्वात मोठ्या टूना फिश चे नाव “अटलांटिक ब्लूफिन टूना” आहे. ही टूना फिश सर्वात अधिक वेगवान व दिसायला रंगीत असते. अटलांटिक ब्लूफिन टूना चे शरीर वेगाने पोहण्यासाठी बनलेले असून. तिची सहनशक्ती अद्भुत असते. ह्या टूना माशाचा रंग निळा असून. लांबी 6.5 फूट व वजन 250 किलोग्राम पर्यंत असू शकते. आत्ता पर्यंत सर्वात विशाल अटलांटिक ब्लूफिन टूना फिश. कॅनडा देशातील नोव्हा स्कॉशिया मध्ये सापडली होती. त्या फिश चे वजन 679 किलोग्राम इतके होते.

ही टूना फिश ४० वर्षा पर्यंत जगू शकते. अटलांटिक ब्लूफिन टूना सर्व महासागरात स्थलांतर करू शकतात. तसेच तीचे वैशिष्ट्य आहे कि. ही टूना फिश समुद्रात 3,000 फूट खोलीवर देखील जाऊ शकते. अटलांटिक ब्लूफिन टूना जन्मजात पारंगत शिकारी असते. ही हेरिंग आणि मॅकरेल सारख्या अनेक माशांची शिकार अगदी सहज करते. ह्या टूना फिश ची किमंत २३ करोड़ पर्यंत देखील असते. अटलांटिक ब्लूफिन टूना फिश ही टूना प्रजाती मध्ये सर्वात मोठी आहे. ही पश्चिम आणि पूर्व अटलांटिक महासागर आढळते.

जगातील सर्वात छोटी टूना फिश | Tuna fish in marathi

जगातील सर्वात छोट्या टूना माशाचे नाव “ब्लॅकफिन टूना” आहे. ह्या टूना फिश ला बर्म्युडा टूना व  ब्लॅकफिन्ड अल्बाकोर टूना फिश नावाने देखील ओळखले जाते. ही ची अधिकतम लांबी 100 cm अणि वजन २१ किलोग्राम असते. ब्लॅकफिन टूना उष्णकटिबंधीय, उबदार पाण्यात राहते. ही  टूना फिश उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर आढळत असून. मॅसॅच्युसेट्स ते ब्राझीलमधील रिओ दी जानेरो पर्यंत आणि मेक्सिकोचे आखात आणि कॅरिबियन समुद्रात ही राहते.

जगातील सर्वात महाग टूना फिश

२०२३ जानेवारी महिन्या मध्ये टोकियो शहरातील टोयोसू नावाच्या फिश मार्किट मध्ये. माशांच्या लिलावात एक ब्लूफिन टूना फिश तब्बल 2,25,45,841.50 रुपयाने विकली गेली. त्या टूना माशाचे वजन 212 किलो होते. ही  जगातील सर्वात महाग विकली गेलेली. टूना फिश मानली जाते.

FAQs About Tuna fish in marathi

Q1) what is tuna fish called in marath?
A:Tuna fish called “kupa” in marathi

Q2) टूना फिश भारतात कोठे आढळते?
टूना फिश भारतात केरळ अणि तमिलनाडु राज्यात असलेल्या समुद्रात आढळते.

Tuna fish in marathi हा लेख तुम्हला कसा वाटला हे आम्हाला कमेंट च्या माध्यमातून कळवा. आणि हा माहितीपूर्ण लेख आपल्या मित्रांसोबत नक्की शेयर करा. आणखी काही महत्वाचे लेख देत आहे. जे तुमच्या साठी उपयोगी असू शकतात.

हे लेख पण तुमच्यासाठी उपयुक्त आहेत

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *