सूर्याची बारा नावे अर्थासह | Suryachi 12 nave | सूर्याची नावे मराठीत

भारतीय वेदांमध्ये सूर्य देवाला सृष्टीचा आत्मा मानले जाते. सूर्यामुळे च पृथ्वीवर जीवन शक्य आहे. वेद व पुराणांमध्ये सूर्य पूजा चे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले गेले आहे. आज आपण ह्या लेख मध्ये suryachi 12 nave अर्थासह पाहणार आहोत. ही नावे 12 सूर्यनमस्कार घालतानी घेतली जातात. ह्या नावान सोबत 12 बारा आसनाची नावे ही दिली आहेत. चला तर मग पाहूया.

महत्त्वाचे – 12 सूर्यनमस्कार (आसन )आहेत. प्रत्येक सूर्यनमस्कार घालण्या आधी क्रमाक्रमाने एक-एक नाव घ्यावे.

1. ॐ मित्राय नमः
अर्थ – संपूर्ण सजीव सृष्टी सोबत मैत्री ठेवणारा.
योगासन – प्रणाम आसन.

2. ॐ रवये नमः।
अर्थ जो सर्वात अधिक तेजस्वी आहे.
योगासन: हस्तउत्थान आसन.

3. ॐ सूर्याय नम:।
अर्थ – अंधार नष्ट करून पृथ्वी ला गतिमान करणारा.
योगासन: हस्तपाद आसन.

4. ॐ भानवे नमः।
अर्थ – जो नेहमी तेजस्वी राहतो.
योगासन: अश्व संचालन आसन.

5. ॐ खगाय नमः।
अर्थ – आकाशात भ्रमण करणारा.
योगासन: दंडासन.

6. ॐ पूष्णे नमः।
अर्थ – सजीवांचे भरण पोषण करणारा.
योगासन :अष्टांग नमस्कार.

7. ॐ हिरण्यगर्भाय नमः।
अर्थ – जो सोन्य सारखा चमकतो. सोनेरी रंग असणारा.
योगासन : भुजंग आसन.

8. ॐ मरीचये नमः।
अर्थ – जो आपल्या किरणांद्वारे सजीव सृष्टीला प्रकाश देतो.
योगासन :पर्वत आसन.

9. ॐ आदित्याय नम: ।
अर्थ – विश्वाची आई अदिति चा मुलगा.
योगासन : अश्वसंचालन आसन.

10. ॐ सवित्रे नमः।
अर्थ – जो पृथ्वी वर जीवन असण्याचे कारण आहे.
योगासन :हस्तपाद आसन.

11. ॐ अर्काय नमः।
अर्थ – जो स्तुति करण्यायोग्य आहे.
योगासन :हस्तउत्थान आसन.

12. ॐ भास्कराय नमः
अर्थ – विश्वाला ज्ञानाचा प्रकाश देणारा देवता.
योगासन :ताड़ासन.

suryachi 12 nave

ही suryachi 12 nave सूर्योदयानंतर सूर्यनमस्कार घालतानी घ्यावी. सूर्यनमस्कार साठी मोकळी जागा निवडावी. जेथून सूर्य दिसतो अशा ठिकाणी. दुसर्या ठिकाणी असेल तरी चालेल.

 suryachi 12 nave

सूर्यनमस्कार घालतानी हि नावे उपयोगात आणल्यास अधिक फायदा होतो.

सूर्यनमस्काराचे फायदे

  • दीर्घायुष्य लाभते.
  • कार्यक्षमता वाढते.
  • डोळ्याचे आरोग्य उत्तम राहते.
  • बल आणि बुद्धिचा विकास होते.

suryachi 12 nave हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच हि पोस्ट इतरांना देखील शेयर करा. तुमच्यासाठी आणखी काही महत्वाच्या पोस्ट खाली देत आहोत. त्या सुद्धा नक्की वाचा.

आणखी काही महत्वाचे लेख वाचा

सबसे अधिक लोकप्रिय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *